हा कसला दगड, ज्यातून वाजतेय घंटा

बुधवार, 14 ऑगस्ट 2019

माणगांव  -  माणगांव तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गापासून कोलाड इंदापूर रस्त्यावर ३ किलो मीटर निसर्ग संपन्न अशा निळज गावातील डोंगर निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे.अनेक तलाव ,छोटे ओहोळ व डोंगर दरी असलेला हा परिसर निसर्गरम्य असा आहे.माळरानावर असलेली वनराई व लाल माती कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव देते. या जंगलातल्या  माळरानावर  दगड माळ आहे. या माळरानात अनेक दगड इतस्ततः विखुरले आहेत.या अनेक दगडात असलेले दोन दगड मात्र अदभुत आवाजाचे असून या दोन दगडांवर दुसऱ्या कोणत्याही दगड अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास घंटे सारखा आवाज येतो.