जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले

शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

पैठण (जि.औरंगाबाद) : जायकवाडी धरण ९१.९९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर गुरूवारपासून (ता.१५) धरणाच्या मुख्य दररवाजातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गुरूवार दिवसभरात 4 दरवाजे उघडण्यात आले होते. शुक्रवारी (ता.१६) त्यात वाढ करून धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावर उघडण्यात आले आहेत. या आठ दरवाजातून 4 हजार 192 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  सध्या धरणात 91.87 टक्के इतका पाणीसाठा आहे.