श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

पुणे - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर यंदाही ‘ओम् नमस्ते गणपतये ओम गं गणपतये नम: मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या उपक्रमाचे ३३ वे वर्ष होते.  (व्हिडिओ : गजेंद्र कळसकर)