पुण्यातील मिरवणूक तीन तास लवकर संपली

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : वैभवशाली परंपरा असलेली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी तब्बल तीन तास लवकर संपली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झालेली मिरवणूक नऊच्या सुमारास मंदावली होती. मात्र पोलिसांनी स्पीकर बंद केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टिळक चौकातून सर्व मंडळ मार्गस्थ झाली होती.