पावसाने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा 

शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. या पावसामुळे पुणेकरांना गेल्या 25 सप्टेंबर रोजी शहरात पडलेल्या भयंकर पावसाची आठवण झाली. या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला. 