राज ठाकरेंच्या सभेत आता हे विघ्न

बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पुणे - लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे न करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत. आज सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, रात्री झालेल्या पावसाने त्या मैदानावर पाणी साचले असून चिखल झाला आहे. त्यामुळे आज राज ठाकरे यांची सभा कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.