..आणि उडाला वटवाघूळाचा रोबोट

गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

न्यूयॉर्क - सायन्स रोबोटिक्सने एक फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका शोध निबंधात दिलेल्या माहितीनुसार, सिलिकॉनचे पंख असलेल्या वटवाघूळाचा रोबोट तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 'बॅट बॉट' असे या रोबोटचे नाव आहे. 

ड्रोन सारखे इतर हवाई रोबोट जे करु शकत नाही ते करण्याची क्षमता या रोबोटमध्ये असणार आहे. जोरदार हवा सुरु असताना ड्रोन त्यामध्ये तग धरु शकत नाही. परंतु, 'बॅट बॉट'च्या पंखांमध्ये असलेल्या लवचिकतेमुळे जोरदार हवा असताना हा रोबोट उडु शकेल असे संशोधकांनी म्हटले आहे. 

असे असले तरी, हा रोबोट आकारोने छोटा असल्याने तो नाजूक आहे. त्यामुळे यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या रोबोटच्या 'लॅंडिंग'वर पुढील संशोधन सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

व्हिडिओ सौजन्य - Science News youtube