गौरी गणपतीची गाणी : सूर्या चमक चमक...

Friday, 25 August 2017

14. गौरी गणपतीची गाणी : सूर्या चमक चमक...
गाण्याचे बोल : 

सूर्या चमक; चमक माझं घर, मी का लोटतो, लोटतो दार-घर
अंगी चोळी ही चोळी हिरवीगार, ठस्याठस्यांचं नेसलं पीतांबर
पायी जोडवी, जोडवी झणकार, पायी मासोळ्या; मासोळ्या किनकारी
पायी पैंजण, पैंजण वंजभार, कमरपट्टीला, पट्टीला कुलपं चार
हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार, पुढं बांगड्या बांगड्या हिरव्यागार
गळ्यात चिताक-चिताक शोभेदार, गळ्यात डोरलं डोरलं पाच पदर
चार तोळ्यांची तोळ्याची बोरमाळ, नाकी नथ ही नथ ही चमकीदार
कपाळी कुंकू हे कुंकू झळके लाल
लेक कुणाची, कुणाची तालेबार.