गौरी गणपतीची गाणी : अगं या गवरीच्या महिन्यात...

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

11. गौरी गणपतीची गाणी : अगं या गवरीच्या महिन्यात...
गाण्याचे बोल : 
अगं या गवरीच्या महिन्यात, लागली गवर, गवर फुलायला.
बंधू लागला लागला बोलायला, जातो बहिणीला बहिणीला आणायला
कर शिदोरी शिदोरी भरपेट, भर शिदोरी शिदोरी काठोकाठ
गेला बहिणीला बहिणीला आणायला, आडव्या नदीला नदीला आला पूर
पाच फुलांची फुलांची केली नाव, त्यात बसले बसले बहीण भाऊ
वल्हं मारतो मारतो नामदेव, नामदेवाच्या देवाच्या एकादशी
भावजं तळती तळती अनारस, आला बहिणीला बहिणीला घेऊईनी
वाढ बहिणीला बहिणीला दूध-भात, रात्री म्हशीनं म्हशीनं दिली लाथ

तांब्या पडला पडला गोरणीत, कुठला वाढू मी वाढू मी दूध-भात
वाढ बहिणीला बहिणीला दही-भात, त्याही दह्याचं दह्याचं केलं ताक
कुठला वाढू मी वाढू मी दही-भात.
वाढ बहिणीला बहिणीला ताक-भात, त्याही ताकाची ताकाची केली कढी
त्याही कढीचा कढीचा नाश झाला.
कुठला वाढू मी वाढू मी कढी-भात.