'या' कुटुंबाने चक्क मगर पाळली

गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पश्चिम जावा (इंडोनेशिया) - मुहम्मद इवन यांनी 1997मध्ये पांगणदर समुग्रकिनाऱ्यावर मुलांना मगरीच्या पिलाबरोबर खेळताना बघितले. त्यांनतर एका मासेमाऱ्याकडून त्यांनी हे पिलू 25,000 रुपयांना विकत घेतले होते. मगरीचे हे पिलू तेव्हा काही दिवसांचे होते. आता मात्र त्याची मोठी मगर झाली असून, गेल्या 20 वर्षापासून हे कुटुंब या मगरीबरोबर राहते. 

सध्या या मगरीचे वजन 200 किलो एवढे आहे. 'कोजेक' असे त्यांनी या मगरीचे नाव ठेवले असून, आपल्याला कोजेकपासून कोणातही धोका नसल्याचे इवन सांगतात. 
सोशल मिडियावर या कुटुंबाचे आणि मगरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, आता अनेक पर्यटकही या कुटुंबाला भेट देण्यासाठी येऊ लागले आहेत.

कोजेक बद्दल बोलताना मुहम्मद म्हणाले, ''कोजेकचा आम्हाला काहीच त्रास नाही. ती एक चांगली मगर आहे. शिवाय तिची फार देखभालही फार करावी लागत नाही. मी फक्त आठवड्यातून एकदा तिचे पाणी स्वच्छ करतो. तिला स्वच्छ करतो आणि दात घोसतो''. 

व्हिडिओ सौजन्य - Caters Clips youtube