esakal | 70 वर्षांच्या आउंचा नाद खुळा; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

70 वर्षांच्या आउंचा नाद खुळा; पाहा व्हिडिओ

Jun 10, 2021

Kolhapur - ही कहाणी आहे ७० वर्षाच्या अनुबाई पुजारी या आजीबाईंची. त्या वयाच्या सातव्या वर्षापासून हे काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना याची आवड न्हवती. मात्र कालांतराने ही आवडही वाढत गेली. रहाटा म्हणजेच चरका, तान्हा म्हणजे सूत या गोष्टींच आजूबाजूला असणं, त्यांचं नेहमीच्या सवयीचं बनून गेलं आहे. घरी त्यांची दीडशे मेंढरे आहेत. मुलगा सुनबाई, नातू यांच्या मदतीने आजही त्या हे काम नेटान करत आहेत. हे काम थोडं जिकिरीचं असल्याचे अनुआजी सांगतात. अगदी मेंढरं राखायला जाण्यापासून ते त्यांचे केस कापणे, ते साफ करणे, ती लोकर पिंजने, राहाटाच्या मदतीने ती लोकर पिंजणे अशी काम करावी लागतात. त्यानंतर त्यापासून तान्हा म्हणजेच धागा काढला जातो. तो धागा किंवा तान्हा साळेवर विणला जातो. त्यांनतर तो सलगरकडे पाठवला जातो. सलगर काही दिवस त्या धाग्याला चिंचोक्याच्या खाळीत भिजवून ठेवतो आणि मग एका घरगुती मशीनवर घोंगडी तयार होते.