Accident occured on Mumbai Pune Highway near Khopoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Mumbai: उलटलेल्या टँकरला धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Published on : 9 May 2022, 8:58 am

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ गॅसचा टँकर उलटून अपघात झाला. यामुळे मुंबई आणि पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. त्यावेळी खोपोली एक्झिटजवळ हा टँकर उलटला. अपघातानंतर टँकरला तीन गाड्या पाठोपाठ धडकल्याने यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलानं घटनास्थळी पोहचून युद्धपातळीवर मदतकार्य केलं. अपघातानंतर दोन्ही मार्गांवरील वाहतूक मंदावली आहे.

Web Title: Accident Occured On Mumbai Pune Highway Near Khopoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top