esakal | दोन दिवसात दबले दहा लाखाचे काम
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Team eSakal

दोन दिवसात दबले दहा लाखाचे काम

Feb 22, 2021

अकोला : हिवरखेड येथील देशभक्त संपतरावजी भोपळे चौक ते बसस्थानक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषद निधीअंतर्गत दहा लक्ष रुपयांचे पेव्हर ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून दहा लाखाचे काम दोन दिवसातच दबले आहे. आणि सर्व पेव्हर ब्लॉक लेव्हल मध्ये न लावता वरखाली लावलेले आहेत. फक्त थातुरमातुर खोदकाम करण्यात आले.  दबाई साठी रोलर सुद्धा फिरविण्यात आले नाहीत. पेव्हर ब्लॉक खाली इस्टिमेट नुसार पूर्ण प्रक्रिया करण्यात आली नाही असे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याची चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. परंतु संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी, अभियंते यांच्या डोळ्यादेखत हे निकृष्ट काम कसे सहन केले जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे शासनाने वरिष्ठ स्तरावर तात्काळ चौकशी करून हे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी अशी विनंती नागरिक करीत आहेत.