Amol Mitkari on Devendra Fadanvis: व्याघ्र दिनानिमित्त फडणवीसांनी केलेलं ट्विट म्हणजे दुटप्पीपणा, मिटकरींची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Amol Mitkari on Devendra Fadanvis : व्याघ्र दिनानिमित्त फडणवीसांनी केलेलं ट्विट म्हणजे दुटप्पीपणा, मिटकरींची टीका

Published on : 29 July 2022, 11:30 am

फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व्य्राघ्रसंवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आरे कारशेडबाबत शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलेल्या निर्णयावरुन अमोल मिटकरींनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

दरम्यान मेट्रोचं कारशेड आरे येथेच उभारण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला. हा निर्णय फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. पण पर्यावरणवादी आणि शिवसेनेचा मात्र आरेतील कारशेडला कायम विरोध होता. त्यामुळे महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनीही कारशेड आरेमधून कांजूरमार्गला हलवले होते. पण आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी कारशेड आरेतच होणार असा निर्णय घेतला. मेट्रोचं कारशेड रखडल्यामुळे मुंबईतील अनेक मार्गांवरील मेट्रो सुरु होऊ शकत नाहीत. त्यामुळे मिटकरींनी फडणवीसांबाबत दिलेल्या प्रतिक्रियेविषयी आणि शिंदे-फडणवीस सरकारनं आरे कारशेडसंदर्भात घेतलेल्या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटतं, हे कमेंट करुन नक्की कळवा.