Anil Ambani : ४२० कोटींचा कर चूकवल्याप्रकरणी अनिल अंबानींना पुन्हा ईडीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Anil Ambani : ४२० कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी अनिल अंबानींना पुन्हा Income Taxची नोटीस

Published on : 26 August 2022, 5:43 am

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानींवर दिवाळखोरीनंतर आता आणखी एक संकट ओढावलं आहे. अंबानी यांनी स्विस बँकेत ठेवलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर त्यांनी ४२० कोटींचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याबद्दल आयकर विभागानं त्यांना नोटिस पाठवली आहे. तसंच ३१ ऑगस्टपर्यंत उत्तर मागवलं आहे.अनिल अंबानी यांनी ८१४ कोटी रुपयांची मालमत्ता लपवल्याचा आरोप आहे. दोन परदेशी बँकांमध्ये त्यांनी हे पैसे ठेवले असून या रकमेवरचा ४२० कोटींचा कर चुकवला असल्याचा आरोप इनकम टॅक्स विभागाने केला आहे. ही रक्कम काळा पैसा असल्याचंही आयकर विभागाने सांगितलं. 

अंबानी यांचे बहामास इथल्या इकाई डायमंड ट्रस्ट आणि आणखी एका व्यापारी संघटनेशी संबंधित आहेत. या कंपन्यांमधून आलेली रक्कम अनंत अंबानींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Web Title: Anil Ambani Ed Notice Again To Anil Ambani In Case Of Tax Evasion Of 420 Crores

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..