Anil Deshmukh Inquiry : या मुद्द्यांवर होणार अनिल देशमुखांची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- फाल्गुनी रणपिसे

Anil Deshmukh Inquiry : या मुद्द्यांवर होणार अनिल देशमुखांची चौकशी; पाहा व्हिडिओ

Published on : 2 August 2021, 8:33 am

शंभर कोटी वसूली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांमागे लागलेला, ईडीचा ससेमिरा काही संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत..ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुखांना समन्स बजावलाय.. याशिवाय त्यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीलासुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आलाय... ईडीने आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.. एकिकडे ईडीकडून अटक टाळण्यासाठी देशमुख कोर्टात धावाधाव करतायत.. तर दुसरीकडे ईडी देशमुखांभोवती फास आवळत चाललीय.. एवढंच नाहीतर चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहितीय.. अनिल देशमुख यांना यापूर्वी तीन वेळा ‘ईडी’ने समन्स बजावला होता.. मात्र देशमुख यांनी चौकशीस जाणे टाळले होते..

Web Title: Anil Deshmukh Inquiry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Anil deshmukh