Video : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरु

Published on : 30 March 2022, 11:33 am

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणींचं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पदस्पर्श दर्शन सुरु होतंय. मराठी नववर्षानिमित्तानं विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्यपूजा सुरु होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च, २०२० रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुलं झालं पण तेव्हा फक्त मुखदर्शनाची मुभा देण्यात आली होती. पदस्पर्श दर्शन अजूनही बंद होतं. पण आता कोरोना संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्यानं भाविकांना, वारकऱ्यांना थेट विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी जाऊन दर्शन घेणं अपेक्षित होतं.

Web Title: At The Moment Of Gudhipadva The Padasparsha Darshan Of Vitthal Rukmini Begins

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..