Fri, March 31, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Bhagat Singh Koshyari : कोश्यारींनी सांगितले १२ आमदारांच्या नियुक्तीचे खरं कारण
Published on : 21 February 2023, 9:22 am
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. या कार्यकाळात राज्यपालांनी अनेक निर्णय प्रलंबित ठेवले. मग तो १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा असो किंवा विधानसभा अध्यक्षांच्या नेमणुकीचा...कोश्यारी कायम मविआच्या निशाण्यावर राहिले. आता कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल नाहीत. राज्यपालपद सोडल्यानंतर कोश्यारींनी गेल्या अडीच वर्षात अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. आणि तेव्हाचा कोश्यारींच्या काळात १२ आमदारांची नियुक्ती का झाली नाही याचं खरं कारण समोर आलं आहे. काय आहे हे कारण जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटात...