महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्यात अडकल्याची भीती

Monday, 24 August 2020

रायगड - रायगडमधील महाडमध्ये पाच माजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तारिक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट्स असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची माहिती समोर येतेय. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सध्या तब्बल ७० ते ८० रहिवासी अडकल्याची माहिती आहे.