Video : अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयची छापेमारी
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली आहे. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयची पुणे - मुंबई परिसरात छापेमारी सुरु आहे. अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. सोबतच शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यावरही छापे पडल्याची माहिती आहे. मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी ही छापेमारी झाली असल्याची माहिती आहे. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वीही गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
Web Title: Cbi Raids Avinash Bhosales House And Office
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..