esakal | हे चार युवा नेते सध्या चर्चेत आलेत;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

हे चार युवा नेते सध्या चर्चेत आलेत;पाहा व्हिडिओ

Jun 10, 2021

Congressमधील युवा चेहरे एकेक करुन पक्षाची साथ सोडताना दिसताहेत. ज्योतिरादित्य शिंदेनंतर युवा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपची वाट धरलीये. हा केवळ राहुल गांधी यांनाच नाही, तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या काँग्रेससाठी मोठा झटकाय. काँग्रेसमध्ये राहुल गांधींची 'चौकडी' म्हणून ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, जितिन प्रसाद आणि मिलिंद देवरा यांना ओळखलं जातं होतं. आता एकेक नेते पक्षापासून वेगळे होताहेत. असे असले तरी, एक वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाऊनही प्रतिष्ठित स्थान मिळवता न आल्याने ज्योदिरादित्य शिंदें यांच्यात अस्वस्थता आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधील युवा नेते सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांच्यामध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळेच हे चार युवा नेते सध्या चर्चेत आलेत.