covid : जगभरात कोरोना पसरवणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोना फोफावतोय... भारताला काय धोका आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

जगभरात कोरोना पसरवणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोना फोफावतोय... भारताला काय धोका आहे?

Published on : 25 November 2022, 3:30 pm

जगभरात कोरोनाचं जाळं पसरवणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगानं जारी केलेल्या माहितीनुसार चीनमध्ये आज ३२,९४३ तर काल म्हणजेच २४ नोव्हेंबरला ३१,६५६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. हा आकडा जरी ३०-३२ हजाराच्या घरात असला तरी चीनच्या १४० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे, असं एका गटाला वाटतं. दुसरीकडे कडक लॉकडाऊन, प्रवासावर निर्बंध लावत ‘झिरो कोविड पॉलिसी’ राबवूनही चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक का होतोय? आणि याचा भारताला कसा धोका आहे हेच जाणून घेऊयात या व्हिडीओतून, पण त्याआधी सकाळचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.

सर्वात आधी चीनमधील कोरोना रुग्णसंख्या पाहूयात-

नॅशनल हेल्थ कमिशनच्या माहितीनुसार या नव्या कोविडच्या लाटेत चीनमध्ये आतापर्यंत २ लाख ९७ हजार ५१६ कोविड रुग्णांची नोंद झालीए तर ५२३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर तिकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) माहितीनुसार चीनमध्ये आतापर्यंत ९५ लाख २३ हजार १४ रुग्णांना कोरोनाची बाधा झालीए तर २९,८८९ जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय.

एकीकडे आकडेवारी कमी-अधिक वाटत असली तरी चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी राबवली जातेय.तरीही रुग्णसंख्येला ब्रेक का लागत नाही?

टॅग्स :covid19