esakal | Coronavirus:बीड जिल्ह्यात कोरोनाकाळातली माणुसकी!; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Coronavirus:बीड जिल्ह्यात कोरोनाकाळातली माणुसकी!; पाहा व्हिडिओ

May 18, 2021

बीड Beed: मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचाcorona मोठा प्रसार होत होता. त्यामध्ये बीड जिल्ह्यातही रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण मृत्यूदर वाढत असल्याने धोका कायम आहे. याकाळात कोरोनाची एवढी भीती वाढली आहे की रुग्णांचे नातेवाईकही रुग्णांच्या जवळ जात नाहीत. अशात जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील विजयसिंह बांगर यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे. नाळवंडीतील (जि.बीड) गुजर कुटुंबिय कोविड इलाजासाठी दवाखान्यात असताना घरी आजी एकट्या होत्या. त्या २ दिवसांपासून अन्नपाण्याविना गोठ्यात पडून असल्याने त्यांच्याजवळही कोणी जाईना. ही माहिती मिळताच विजयसिंह बांगर यांनी धाव घेत आजींना रुग्णालयात नेले. आजींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह corona report आला असून आता त्यांच्यावर इतर उपचार सुरू आहेत.