महापालिकेच्या शाळा झाल्या सज्ज; पालक मात्र उदासीन

Sunday, 22 November 2020

पुणे - राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या सर्व सरकारी, खासगी शाळा आणि वसतिगृहे येत्या सोमवार (ता. 23) पासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पालकांच्या संमतीवर अवलंबून राहील. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पालकांची लेखी संमतीनंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर 23 तारखेला सोमवारी सुरू होणाऱ्या शाळांसाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक मंडळी सज्ज झाले आहेत.

पुणे - राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या सर्व सरकारी, खासगी शाळा आणि वसतिगृहे येत्या सोमवार (ता. 23) पासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पालकांच्या संमतीवर अवलंबून राहील. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पालकांची लेखी संमतीनंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर 23 तारखेला सोमवारी सुरू होणाऱ्या शाळांसाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक मंडळी सज्ज झाले आहेत. पण, शाळेत विद्यार्थी येईल की नाही ही मोठी शंका आहे. औंध रोड चिखलवाडी येथील महापालिकेच्या शाळेतील स्थितीचा आढावा घेतला आहे सकाळचे व्हिडिओग्राफर प्रमोद शेलार यांनी.