Pune News: KFC च्या नावाखाली सायबर चोरांनी महिलेला ७९ लाखांना गंडवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षय बडवे

Pune News: KFC च्या नावाखाली सायबर चोरांनी महिलेला ७९ लाखांना गंडवलं

Published on : 16 August 2022, 2:30 pm

पुण्यात एका ४६ वर्षीय महिलेची सायबर चोरांनी तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे..ऑनलाइन कंपनी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेची ओळख गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू या तिघांशी झाली. केएफसीची फ्रेंचाइजी तुम्हाला मिळवून देतो, असे आमिष दाखवत या तिघांनी कंपनीचा खोटा ई-मेल आयडी तयार केला आणि कंपनीची बनावट कागदपत्रं बनवून त्यांनी महिलेला पाठवले. त्यानंतर महिलेला तब्बल ७९ लाख ७६ हजार रुपये बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगितले. आणि इथेच या महिलेकडून एक मोठी चूक झाली. या महिलेनं मागेपुढे कसलाही विचार न करता आपल्याला फ्रॅंचाईजी मिळणार या आशेने तब्बल ७९ लाखांची रक्कम चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा केली. मग काय? पैसे मिळाल्यावर तिन्ही भामट्यांनी फोन बंद केले. महिलेशी संपर्क तोडला. आणि त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि मग त्यांनी पोलिसात धाव घेतली.- हा सगळा प्रकार मार्च ते मे महिन्यादरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या तिन्ही व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. नेमके हे तिघं आहेत कोण? यांची नावं काय? आणि यात कुठली गॅंग सक्रीय आहे का? याचा तपास पोलीस घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सत्यता पडताळणी करुनच आर्थिक व्यवहार करावा असा सल्ला पोलिसांनी दिलाय.

Web Title: Cyber Thieves Duped Woman Of Rs 79 Lakh In The Name Of Kfc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..