Video : अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्याची आरास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्याची आरास

Published on : 3 May 2022, 8:12 am

अक्षय्य तृतीयेनिमित्त घरबसल्या प्रेक्षकांना आता मुंबई आणि पुण्यातील बाप्पांचं दर्शन घडणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज अक्षय्य तृतीयेनिमित्त ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षय्यतृतीयेला हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे उद्या ससून हॉस्पिटलमधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येईल. याबरोबरच अक्षय्य तृतीयेला मुंबईच्या दादरमधील श्री उद्यान गणेश मंदिरात मनसेकडून आंब्याची आरास करण्यात आली. दादरच्या शिवाजी पार्कमधील उद्यान गणेश मंदिरात आज आणि उद्या आंब्याची आरास करण्यात आली. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडून ही आंब्याची आरास करण्यात आली आहे.

Web Title: Dagdusheth Ganpati Pune Mango Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top