व्हिडिओ
शिवसेना, शिवाजीपार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे गेल्या ५० वर्षांतील समीकरण शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर अडचणीत आले आहे. सध्या शिंदे गटात गेलेले दादर येथील स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेकडे यंदाच्या मेळाव्यासाठी मैदान मिळण्यासाठी अर्ज केल्याने उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर संकट ठाकले आहे. त्यातच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही पक्षप्रमुख राज ठाकरे यांना या ठिकाणी मेळावा घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे यंदा दसरा मेळाव्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये चुरस लागली आहे.