EXCLUSIVE: या गावात आहे ज्ञानाचे मंदिर; गावात शिक्षणाचा अनोखा उपक्रम

Friday, 7 August 2020

महाराष्टात सध्या कोरोनाच्या महामारीने प्रत्येक क्षेत्र बाधित झाला आहे.याचा सर्वात जास्त फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला कारण १५ मार्च २०२० पासून जी मुलांची शिक्षणाची चाके धावायची थांबली ती अद्याप सूर नाहीत.याला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय अनेक ठिकाणी सुरू आहे.शहर व ग्रामीण भागात व्हाट्सऍप, फेसबुक ,युट्युब,झूम तसेच गुगल मीट यावर सर्वत्र शिक्षण सुरू आहे.बादोले ता.अक्कलकोट येथील मुख्याध्यापक श्री सुनील गुमास्ते यांनी महादेव सोनकर व डिजिटल युगात पत्रलेखानाचे छंद स्वतः बाळगून विदयार्थी वर्गास आवड लावणारे कला शिक्षक मयूर दंतकाळे यांना गावात मोबाइल सव्हे करण्यास सांगितले असतात त्यांना इयत्ता ५ वी ते १०

महाराष्टात सध्या कोरोनाच्या महामारीने प्रत्येक क्षेत्र बाधित झाला आहे.याचा सर्वात जास्त फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला कारण १५ मार्च २०२० पासून जी मुलांची शिक्षणाची चाके धावायची थांबली ती अद्याप सूर नाहीत.याला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय अनेक ठिकाणी सुरू आहे.शहर व ग्रामीण भागात व्हाट्सऍप, फेसबुक ,युट्युब,झूम तसेच गुगल मीट यावर सर्वत्र शिक्षण सुरू आहे.बादोले ता.अक्कलकोट येथील मुख्याध्यापक श्री सुनील गुमास्ते यांनी महादेव सोनकर व डिजिटल युगात पत्रलेखानाचे छंद स्वतः बाळगून विदयार्थी वर्गास आवड लावणारे कला शिक्षक मयूर दंतकाळे यांना गावात मोबाइल सव्हे करण्यास सांगितले असतात त्यांना इयत्ता ५ वी ते १० च्या वर्गातील ३७५ मुलांपैकी अँड्रॉइड व साधे असे मिळून फक्त ९० विद्यार्थ्यांकडे मोबाइल आढळून आले.त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाला येत असलेले बाधा ओळखून दंतकाळे यांनी त्याला एक पर्याय काढून गावातली सर्व मंदिरे व मस्जिद तसेच समाज मंदिर यावर दररोज लावली जाणारी स्पीकर हे शिक्षणाची माध्यमे होऊ शकतील का याची चाचपणी केली गेली.त्यानुसार गावातील महादेव मंदिर,खंडोबा मंदिर,तसेच विठ्ठल मंदिर तसेच मस्जिद येथे शाळेकडून पत्रे दिली गेली होती.त्यापैकी तिन्ही मंदिराची परवानगी पत्रे मिळाली असल्याने तिथे शिक्षण सध्या सोमवारपासून देणे सुरु झाले आहे.