23 July तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याच दिवशी घेतली होती लोकसभेकडून आणिबाणीला मंजूरा
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या दुर्दैवी हत्या झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची सुरक्ष व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली.....आता तर एसपीजी आणि ब्लॅक कॅट कमांडो यांचं कवच भेदून या नेत्यांपर्यंत पोहोचणंही अवघड......
पण पुण्यात निदर्शकांनी चक्क एका पंतप्रधानांची मोटार अडवून दाखवली होती.....ही घटना घडली होती आजच्याच तारखेला म्हणजे २४ जुलै १९७७....ज्यांची मोटार अडवली गेली ते होते मोरारजी देसाई......
त्या दिवशी टिळक स्मारक मंदीरात विश्वकोशाचं प्रकाशन मोरराजी देसाई यांच्या हस्ते झालं.....तो कार्यक्रम आटोपून पंतप्रधानांच्या मोटारीचा ताफा बाहेर येतानाच हा प्रकार घडला......
देशातल्या वाढच्या महागाईच्या विरोधात विरोधी पक्ष पंतप्रधानांसमोर निदर्शन करणार होते....युवक काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाला त्यासाठी पोलिसांनी जागा ठरवून दिल्या होत्या....रस्त्याला कठडेही बांधले होते....
मोरारजी देसाई बाहेर पडण्याच्या वेळीच निदर्शकांनी पोलिसांशी धक्काबुक्की सुरु केली...त्या गोंधळात पोलिसांचं कडं सैल झालं आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संधी साधली....
पंतप्रधानांच्या मोटारीपुढची सायरन कार निदर्शकांनी जाऊ दिली....त्यानंतर अचानक हे कार्यकर्ते कठडे तोडून पुढं घुसले आणि त्यांनी पंतप्रधानांची मोटार अडवली.....त्यातले काही जण रस्त्यावर तर काहीजण चक्क पंतप्रधानांच्या गाडीवर आडवे पडले होते....निदर्शकांनी येताना पिशव्यांतून फाटक्या चपलाही आणल्या होत्या..त्यापैकी एक चप्पल पंतप्रधानांच्या गाडीवर पडली होती....
यात काही जणांना पोलिसांनी नंतर अटक केली.....यात प्रमुख नाव होतं सुरेश कलमाडी यांचं.....या घटनेनंतर सुरेश कलमाडींचं महत्त्व काँग्रेसमध्ये वाढलं आणि त्यातून पुणे शहराचं नवं नेतृत्व पुढच्या काळात उभं राहिलं.....
--------------------------------------------
श्रीलंकेत ९०च्या दशकात वांशिक हिंसाचारानं थैमान घातलं होतं......२४ जुलै १९९६ रोजी याच वांशिक हिंसाचारानं आणखी उग्र रुप धारण केलं....एलटीटीई अर्थात लिबरेशन टायगर्स आॅफ तामीळ इलमच्या अतिरेक्यांनी राजधानी कोलंबोमध्ये एका पॅसेंजर रेल्वेगाडीच्या डब्यात शक्तिशाली बाँबचा स्फोट घडवून आणला होता.....
या स्फोटात ६७ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते तर सुमारे ६०० जण जखमी झाले होते.....कोलंबोचं उपनगर असलेल्या देहिवेला रेल्वे स्थानकावर हा बाँबस्फोट घडवण्यात आला होता.....या शक्तीशाली बाँबस्फोटात या रेल्वेगाडीचे दोन्ही डबे अक्षरशः वितळून गेल्याचं वृत्त त्यावेळी न्यूज एजन्सीनं दिलं होतं आणि दैनिक सकाळनं ते प्रसिद्ध केलं होतं.....
याच वर्षाच्या सुरुवातीसही कोलंबोमध्ये एक मोठा बाँबस्फोट झाला होता....१९९६ च्या ३१ जानेवारीला एलटीटीईच्या सुसाईड बाँबर्सनी कोलंबोतल्या सेंट्रल बँक मुख्यालयासमोर बाँबस्फोट घडवला होता....
२४ जुलैला ज्या रेल्वेगाडीत हा बाँबस्फोट झाला त्याच रेल्वेगाडीच्या आणखी एका डब्यात अतिरेकांनी बाँब ठेवला होता....पण तो सुदैवानं निकामी करण्यात आला.
--------------
याच दिवशी भारतात विजापूरजवळ भीमा नदीत एक टेंपो कोसळला आणि त्यात ३५ जण मृत्युमुखी पडले होते. गुलबर्ग्याहून शहापूरकडं हा टेंपो शहापूरकडं निघाला होता.....पावसामुळं निसरड्या झालेल्या रस्त्यावरुन तो घसरला आणि भीमेवरच्या पुलाचा कठडा तोडून नदी पात्रात कोसळला....
---------------------
ती तारीख हाच दिवस या सदरात आता पाहू एक जुनी जाहिरात.....
स्टोव्हचा वापर आता जवळपास थांबला आहे.....ग्रामीण भागात किंव काही ठिकाणी तो होत असेलही.....या स्टोव्हचा बर्नर पेटवणं, त्यासाठीची सुई, राॅकेलचा काकडा हा जुन्या पिढीला नक्की आठवेल.....२४ जुलैच्या दैनिक सकाळच्या एका जुन्या अंकात प्रसिद्ध झालेली ही बर्नरची जाहिरात......
ती तारीख हाच दिवसमध्ये आता तुमचा निरोप घेतो आणि उद्या पुन्हा भेटतो २५ जुलैच्या तारखेला मागील काही वर्षांत काय घडलं ते सांगण्यासाठी...
Web Title: Fifty Years Of Air Was Celebrated On This Day Know More Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..