
पारोळा : अंगात कला असली, की व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पारोळ्याचा तरुण गणेश लोहार... गणेश साधारणत: चाळिशीकडे झुकणारा तरुण...घरची परिस्थिती बेताची... त्यातच कोरोना महामारीचा फटका..शेतीची लाकडी औजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, असा प्रश्न समोर असतानाच गणेशने आपल्या कलेला वेगळी वाट निर्माण करून देत. छोट्या बैलगाड्या तयार केल्या. आधुनिकतेची जोड देत या बैलगाड्यांचे छायाचित्र फेसबुक, व्हॉट्सॲप अशा सोशल साइट्सवर व्हायरल केले. बघता बघता त्याच्या या कलेला चांगलीच दाद मिळाली.
पारोळा : अंगात कला असली, की व्यक्ती कोणत्याही संकटावर मात करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पारोळ्याचा तरुण गणेश लोहार... गणेश साधारणत: चाळिशीकडे झुकणारा तरुण...घरची परिस्थिती बेताची... त्यातच कोरोना महामारीचा फटका..शेतीची लाकडी औजारे बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा, असा प्रश्न समोर असतानाच गणेशने आपल्या कलेला वेगळी वाट निर्माण करून देत. छोट्या बैलगाड्या तयार केल्या. आधुनिकतेची जोड देत या बैलगाड्यांचे छायाचित्र फेसबुक, व्हॉट्सॲप अशा सोशल साइट्सवर व्हायरल केले. बघता बघता त्याच्या या कलेला चांगलीच दाद मिळाली. मोठ्या प्रमाणावर ‘मॅाडेल’ बैलगाड्यांची विक्री होऊ लागली. आज जिद्द आणि मेहनतीच्या बळावर गणेशने आपल्या कुटुंबाला या संकटातून सावरले आहे.