Sun, March 26, 2023
Video- सकाळ ऑनलाईन
Video: गृहमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
Published on : 1 March 2022, 7:45 am
महाशिवरात्रीनिमित्त १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भिमाशंकरला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. महाराष्ट्रासह देशभरातून शिवभक्त भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी आलेत. भोलेनाथाचं दर्शन घेता येत असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांसाठी मंदिर खुलं केल्यानं भिमाशंकरला आजपासून भक्तीचा महासागर ओसांडून वाहतोय.