Sat, Sept 30, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Lumpy Virus : लंपी आजाराला कसं रोखाल ?
Published on : 15 September 2022, 3:35 am
Lumpy Virus : जनावरांतील लंपी स्किन आजार महाराष्ट्रातही हात पाय पसरु लागलाय. गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे अनेक पशुपालक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनावरांतील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत या आजारामुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काळात याकडे दुर्लक्ष केल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.