Jayant Patil on MVA Government : आपला मुख्यमंत्री असेल तरच कामं होतात, जयंत पाटलांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Jayant Patil on MVA Government : आपला मुख्यमंत्री असेल तरच कामं होतात, जयंत पाटलांचा टोला

Published on : 3 November 2022, 2:32 pm

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, याबद्दलची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरपणे व्यक्त केली. पुरंदर पब्लिसिटीच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर आधारित "अजितदादा पवार कॉफी टेबल" या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन समारंभात जयंत पाटील बोलत होते.