esakal | कारण शोधून रस्त्यावर यायलाच पाहिजे?; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

कारण शोधून रस्त्यावर यायलाच पाहिजे ?पाहा व्हिडिओ

May 25, 2021

रियालीटी चेकचे वास्तव - मार्केट सकाळी सात ते अकरा

साहेब, काल पॅन्ट खरेदी केली, आज बदलण्यासाठी आलोय.. गाडी दुरुस्त करण्यासाठी निघालोय, लायसन्स घरी विसरले आहे, हा फोन घ्या.. डिपार्टमेंटचाच आहे...तीन मेस लग्न झाले आहे, कडक लॉकडाऊन मुळे बाहेर पडणे शक्य नव्हेत म्हणून आज पत्नीला घेवून करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आलोय... सकाळी सात ते अकरा दरम्यान कोल्हापूर शहरात काय चाललेले असते. लॉकडाउनची स्थिती काय आहे, यासाठी आम्ही शहरातील महत्वाचे चौक, बाजारपेठ, अंबाबाई मंदिर अशा ठिकाणी ‘रियालीटी चेक़़' केली त्यातून काय काय पुढे आले हे थोडक्यात... उमा चौकात वाढती गर्दी पाहून आम्ही थांबलो वाहतूक नियंत्रित करताना दुचाकीवरून जाणारया महिलेस थांबविले. त्यांनी बॅंकेत जात असल्याचे सांगितले. ओळखपत्र ही दाखविले, तरीही वाहन चालक परवाना (लायसन्स)ची मागणी केली. लायसन्स दाखविल्यावरच सोडण्यात आले. स्पोटर्स बाईकवरून जाणाऱ्या दोघा तरुणांना अडविले.

(बातमीदार - लुमाकांत नलवडे) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)