esakal | नंदीग्राममध्ये पराभव; ममता मुख्यमंत्री कशा होणार?

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
नंदीग्राममध्ये पराभव; ममता मुख्यमंत्री कशा होणार?
May 3, 2021

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केलाय, पण प्रतिष्ठेची ठरलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममतांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्याकडून पराभव स्वीकारावा लागलाय. बंगालमध्ये विधान परिषद नसल्याने त्या या माध्यमातून मुख्यमंत्रीपदावर दावा करणं अशक्य आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार का? तर या प्रश्वाचं उत्तर आहे, होय, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या कोणत्या पद्धतीने मुख्यमंत्री होतील, या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया..!