Women rapes Man in Punjab : पंजाबमध्ये पुरुषावर सामूहिक बलात्कार, जाणून घ्या प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Women rapes Man in Punjab : पंजाबमध्ये पुरुषावर सामूहिक बलात्कार, जाणून घ्या प्रकरण

Published on : 24 November 2022, 3:30 pm

४ तरुणींचा एका तरुणावर सामूहिक बलात्कार... ऐकून धक्का बसत असला तरी ही घटना घडलीए पंजाबमधील जालंधरमध्ये. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं एका कारमधील ४ तरुणींनी एका व्यक्तीला थांबवलं. मग त्याला गुंगीचं औषध देऊन आपल्या कारमध्ये बसवलं आणि चौघींनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय. विशेष म्हणजे या घटनेतील पीडित तरुण हा विवाहित असून त्याला मुलं आहेत. तो एका फॅक्टरीत कामगार म्हणून काम करतो.

पीडित तरुणाच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी कामावरुन घरी परतत असताना त्याला एका कारनं थांबवलं. त्याच्या हातात पत्ता असणारा कागद दिला. त्यावरील पत्ता वाचत असतानाच तरुणींनी त्याच्या डोळ्यावर स्प्रे मारला; जेणेकरुन त्याला दिसेनासं झालं आणि तो बेशुद्ध झाला. मग त्याला त्यांनी कारमध्ये खेचलं. जंगल परिसरात नेलं आणि तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडित रस्त्यावर पडलेला आढळून आला आणि तरुणींनी मात्र तिथून पळ काढला होता.

शरमेच्या भीतीनं पीडित व्यक्तीनं पोलिसात तक्रार दिली नव्हती. पण, या घटनेची चर्चा वाढल्यानंतर पोलिसांनीच सुमोटो कारवाई करण्याचं ठरवलं. आणि याप्रकरणी पंजाब पोलिसांकडून तपास केला जात आहे.

एकीकडे महिलेला हाताला धरुन बाजूला केलं तरी विनयभंगाची तक्रार दाखल होते तर तिकडे पंजाबमध्ये थेट पुरुषावरच सामूहिक बलात्कार होतो... हे आपल्या समाजातलं प्रत्यक्षातलं विरोधाभासी पण धक्कादायक असं वास्तव आहे. तरुणींवरील बलात्काराची प्रकरणं आपण ऐकत आलोय, वाचत आलोय.. एकीकडे ती थांबावीत म्हणून जनजागृतीही केली जाते पण आता पुरुषांवरही बलात्काराच्या घटना होत असतील तर या समाजात नेमकं सुरक्षित कोण? हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Punjab