Video : भाजप नेते प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : भाजप नेते प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Published on : 17 March 2022, 11:03 am

भाजप नेते प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. सोमवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. सरकारी वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्यानं त्यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितली. १९९७ मध्ये दरेकर मजूर होते. कालांतरानं ते राजकारणात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचं सांगत त्यांना अपात्र ठरवलं. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलं होतं. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असं नमूद केलं होतं.

Web Title: Mumbai Sessions Court Consoles Bjp Leader Praveen Darekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top