Wed, October 4, 2023
Video- शुभम किशोर पांडव
भरत गोगावलेंसाठीचा डाव, ठाकरेंच्या अंगलट, जगतापांमुळे पटोले भडकले
Published on : 8 May 2023, 2:02 pm
गेल्या काही दिवसात मविआमध्ये सारे आलबेल नाही याची प्रचिती वारंवार येताना दिसत आहे. कधी अजित पवार संजय राऊतांची खडाजंगी असो किंवा कधी राहुल गांधींना सावरकरांच्या विषयावरुन उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सुनावलेले खडे बोल... ठिणग्या या पडत होत्या मात्र आग भडकत नव्हती. कारण वरिष्ठ नेतृत्वाकडून सांभाळून घेतले जात होते. मात्र आता नुकत्याचा झालेल्या महाड येथे उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे मविआतली धुसफुस पुन्हा एकदा उफाळून आली आहे. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. नेमकं काय झालंय जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये