'अण्णा भाऊ साठे हे स्वातंत्र्यसैनिक', पार्श्वगायक नंदेश उमप म्हणतायेत

शुक्रवार, 31 जुलै 2020

पुणे - अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी लावण्याआधी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. अण्णाभाऊंनी त्यांच्या पोवाड्यांमधून डफलीवर थाप मारुन संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत क्रांतीचे जे रणशिंंग फुंकले त्याला तोड नाही, असे उद्गगार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी व्यक्त केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त आज संवाद पुणे आणि समर्थ युवा फाैऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मनित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापाैर सरस्वती शेडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, सचिन ईटकर, निकिता मोघे आणि पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डाॅ. सुनील भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.