नंदी म्हणतो कोरोना जाईल पळून!

Thursday, 1 October 2020

उमरेड (जि. नागपूर) : देशातील माणूस अनेक प्राण्यांचा वापर करीत त्याच्या सोबतीने समाजात कलाकौशल्य दाखवून मिळालेल्या थोड्या मिळकतीत आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित असतात. असाच एक तरुण तालुक्यातील पाचगाव जवळील सालाई मेंढा गावचा रहिवासी. त्याचा पिढीजात व्यवसाय म्हणजे एक पाठीवर नक्षीदार झूल पांघरलेला, कवड्यांची माळा गळ्यात घालून सजविलेल्या एक धार्मिक, दैविक स्वरूप प्राप्त झालेला नंदी घेऊन गावोगावी फिरत महादेवाचे गाणे, भजन गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करणे असा आहे. बैलांचा मालक विचारतो आशीर्वाद देशील का तर तो मान हलवून आशीर्वाद दिल्याचा इशारा देतो.

उमरेड (जि. नागपूर) : देशातील माणूस अनेक प्राण्यांचा वापर करीत त्याच्या सोबतीने समाजात कलाकौशल्य दाखवून मिळालेल्या थोड्या मिळकतीत आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवित असतात. असाच एक तरुण तालुक्यातील पाचगाव जवळील सालाई मेंढा गावचा रहिवासी. त्याचा पिढीजात व्यवसाय म्हणजे एक पाठीवर नक्षीदार झूल पांघरलेला, कवड्यांची माळा गळ्यात घालून सजविलेल्या एक धार्मिक, दैविक स्वरूप प्राप्त झालेला नंदी घेऊन गावोगावी फिरत महादेवाचे गाणे, भजन गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करणे असा आहे. बैलांचा मालक विचारतो आशीर्वाद देशील का तर तो मान हलवून आशीर्वाद दिल्याचा इशारा देतो. तसेच कोरोनासुद्धा लवकर पळून जाणार असल्याचे संकेत सुद्धा तो देतो. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)