Narhari Zirwal यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सूचक विधान केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Narhari Zirwal यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सूचक विधान केलं

Published on : 9 May 2023, 4:16 am

राज्यातील सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साधारणपणे 10 ते 15 मे नंतर हा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा निकाल काय असेल याची राज्यासह देशातील नेत्यांना आणि सामान्यांना उत्सुकता आहे. हा निकाल येण्याआधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्याकडे त्या 16 आमदारांचं प्रकरण आल्यास मी त्यांना अपात्र करेन, असं नरहरी झिरवळ यांनी म्हंटलं आहे.