Video : जदयूचा भाजपसोबत काडीमोड, शिंदेगटावर साऱ्यांच्या नजरा
एनडीएसोबत काडीमोड घेत नीतीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा धक्का दिल्याचं बोललं जातंय. सत्तेत येऊन २ वर्ष पूर्ण होण्याआधीच सरकार पडल्यामुळेच बिहारमधील राजकारणाची देशभरात चर्चा होतेय. भाजप आणि नीतीश कुमार यांच्यात मागील काही महिन्यांपासून शीतयुद्ध सुरु होते. अखेर हा वाद टोकाला गेला आणि आज नीतीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएसोबत काडीमोड घेतला. माहितीसाठी, याआधीही नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या जदयूला कमी जागा मिळूनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतलं होतं. त्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. आता अशीच परिस्थिती राज्याच्या राजकारणातही आहे. भाजपच्या जास्त जागा असूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलंय तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी आहेत. त्यामुळे बिहारप्रमाणे परिस्थिती महाराष्ट्रात होणार का? हा येणारा काळच सांगेल.