पर्यटकांना भूरळ घालणारा गगनबावडा यंदा का आहे सुना सुना?

Wednesday, 8 July 2020

कोल्हापूर - गगनबावडा म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका. सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा आणि तेथील धुकं साऱ्यांनाच भुरळ घालतं. येथे कोसळणारा धो धो पाऊस तर पर्यटकांना प्रत्येक वर्षी हमखास खुणावतो. सिंधूदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेला करुळ घाट म्हणजे तर वर्षा पर्यटनासाठी सहकुटूंब जाण्याचं हक्काचे ठिकाण. या संपूर्ण परिसराने आता जणू हिरवा शालू परिधान केला आहे आणि निसर्गाची मुक्त उधळण यानिमित्ताने साऱ्यांनाच अनुभवायला मिळते आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात एकत्रीतपणे फिरवण्यावर बंधने असल्याने घाटरस्ता अजूनही स्पर्शहीन आहे. (व्हिडिओ - मोहन मेस्त्री)