सोशल मिडियावर गाजताहेत परभणीचे ‘संजय राऊत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Team eSakal

सोशल मिडियावर गाजताहेत परभणीचे ‘संजय राऊत’

Published on : 5 December 2019, 8:51 am

परभणी : गेल्या महिन्याभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहीलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. श्री. राऊत यांनी निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे लावून धरले होते. त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. परंतू, त्या घडामोडीत परभणीतही दुसरे संजय राऊत चांगलेच गाजले. खऱ्या संजय राऊत व परभणीतील संजय राऊत (लक्ष्मण भदरगे) यांच्या चेहऱ्याशी बरेच साम्य असल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांच मुळ नाव ‘लक्ष्मण भदरगे’ असे आहे. ते जिल्हा पोलिस दलात नोकरीस आहेत.