esakal | आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार; पाहा व्हिडिओ

May 12, 2021

पिंपरी - पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाजवळ गोळीबार झाला. ही घटना बुधवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. आरोपीने पिस्तूलातून गोळ्या झाडल्या असून यामध्ये कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहितीमिळत आहे. चिंचवड स्टेशन येथे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पिस्तूलातून गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त केले आहे.