Prabhu Vadiyanth Mandir Mahashivratri Beed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

परळीत प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ

Published on : 1 March 2022, 3:45 pm

परळी वैजनाथ (जि.बीड) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वानिमित्त मोठी गर्दी झाली असून राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील शिवभक्तांनी तब्बल दोन वर्षानंतर महाशिवत्रारीला दर्शनाचा लाभ घेतला. येथील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह राज्य, परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादूभावामुळे मंदिरे बंद करण्यात आली होती.