कृत्रिम पायावर उभा राहिला;आता हातांसाठी प्रकाशला हवीये मदत

Wednesday, 13 January 2021

पुणे - हसत्या- खेळत्या कुटुंबावर प्रकाशच्या अपघातामुळे आभाळच कोसळले.  विजेच्यां  तारांवर पडल्याने प्रकाशचे हात-पाय निकामी झाले. कुटंबावर संकट ओढावले. अखेर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीसाठी पुढे सरसरावल्या आणि  प्रकाश त्याच्या कृत्रिम पायांवर उभा राहिला. आता तो वाट पाहतोय केव्हा त्याला कृत्रिम हात मिळतील आणि पुन्हा कुटुंबासाठी सर्व काही करु शकेल. पण आर्थिक मदतीअभावी त्याला आणखी वाट पाहावी लागत आहे. प्रकाशच्या कुटुंबाला गरज आहे ती मदतीची.

स्वयंसेवी संस्थाच्या मदतीतून बसवलेल्या कृत्रिम पायामुळे प्रकाश आता स्वतःच्या पायावर उभा राहू लागलाय. एवढेच नव्हे तर तो रोज चालण्याचा सरावसुध्दा करतोय. आता त्याला कृत्रिम हात बसवून पुर्ववत करणे बाकी आहे. त्यासाठी पस्तीस लाख रुपयाचा निधी लागेल असे केरळच्या रुग्णालयाने सांगितले आहे. ही मदत मिळाल्यास पत्नी, दोन लहान मुले व वृध्द आई वडील यांची जबाबदारी पुन्हा पुर्वीच्याच जोमाने अंगाखांद्यावर घेवू शकतो असा विश्वास प्रकाशला आहे.