Thur, October 5, 2023
Video- Shubham Botre
Prasad Oak एका नवीन पात्रात दिसणार आहे Dr.Babasaheb Ambedkarयांच्याशी संबधित हा चित्रपट
Published on : 26 April 2023, 2:48 pm
धर्मवीर या चित्रपटातील प्रसादच्या अभिनयानं अख्या महाराष्ट्र वेडा झाला होता. प्रसाद ओक हा अभिनेता हल्ली बायोपिक करण्यावर भर देत असल्याची चर्चा आहे. तसेच प्रत्येक पात्र तो योग्यपद्धतीने वठवत असतो. धर्मवीर आणि चंद्रमुखीच्या यशानंतर प्रसाद ओक डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आणि त्यांचा एका घटनेविषयी कधीच न चर्चिल्या गेलेल्या घटनेवर नवा सिनेमा घेऊन येत आहे. त्याविषयी सकाळ माध्यमाशी प्रसादने संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपट येणार असल्याची बरीच चर्चा होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या मोशन पोस्टर अनावरण करण्यात आले.