Pune Police कर्मचाऱ्याची भन्नाट शक्कल, कुत्र्याला हेल्मेट घालून पुणेकरांना शिकवली अक्कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pune Police कर्मचाऱ्याची भन्नाट शक्कल, कुत्र्याला हेल्मेट घालून पुणेकरांना शिकवली अक्कल

Published on : 31 March 2023, 4:40 am

पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध झाल्यापासून आजही पुण्यात मुंबईसारखा हेल्मेट सक्तीचा नियम पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या नागरिकांचे हेल्मेट संदर्भात प्रबोधन व्हावे म्हणून पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. ही हेल्मेट जनजागृती करण्यासाठी पुण्यातील वाहतूक पोलिसानं अनोखी शक्कल लढवली. थेट पाळीव श्वानाला हेल्मेट घालून वाहतूक पोलिसानं जनजागृती सुरू केली. वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकाना हेल्मेट घालण्याच आवाहन केलं. या पोलीस कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्यामध्ये हा कर्मचारी कुत्र्याला हेल्मटे घालून बाईकवरुन फिरवताना दिसत आहे त्याचवेळी नागरिकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करताना दिसत आहे.