esakal | खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर, प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम
Apr 29, 2021

पुणे : कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर आयसीयूमध्ये असून सध्या ते व्हेंटिलेटवर आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु असेही कदम यांनी सांगितलं.